नाशिक : प्रतिनिधी
राज्यात सध्या हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे समोर आले असताना नाशिकमध्ये पुन्हा एकदा एक महिला अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. मर्सिडीज कारची मागणी करत माहेरून २५ लाख रुपये आणण्यासाठी स्नेहल घुले या डॉक्टर पत्नीचा आयटी इंजिनीअर पतीकडून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
या प्रकरणी महिलेचा पती, सासू-सासरे आणि दीर- नणंद यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत असून तपासाअंती या घटनेचे सत्य समोर येणार आहे.
एकीकडे राज्यात पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गाजत असताना या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. असे असताना नाशिकमध्ये अशाच दोन घटना समोर आल्याचे समोर आले आहे. शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे ३७ वर्षीय विवाहित महिला भक्ती अथर्व गुजराथी हिने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली होती.