19.4 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रशिक्षिकेचा अश्लील व्हीडीओ व्हायरल

शिक्षिकेचा अश्लील व्हीडीओ व्हायरल

बीड : शहरामध्ये असलेल्या मिलिया माध्यमिक शाळेतील आमेर काझी या शिक्षकाने सहकारी शिक्षिकेचे अश्लील व्हीडीओ रेकॉर्ड केले होते. दरम्यान, आता याच प्रकरणी आता मिलिया शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून बीड शहर पोलिस ठाण्यात आमेर काझी आणि अश्लील व्हीडीओ व्हायरल करणा-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमेर काझी या शिक्षकाने शाळेतील अनेक शिक्षिकांसोबत अश्लील व्हीडीओ रेकॉर्ड केले होते. त्यानंतर हे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शाळेची मोठी बदनामी झाली. त्यामुळे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून आता आमेर काझी या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमेर काझी याबरोबरच व्हीडीओमध्ये असलेल्या महिला शिक्षकांना देखील शाळेने निलंबित केले आहे. तर, या प्रकरणात दोषी असलेल्या काही शिक्षकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपास केला जात आहे.

बीड शहरात अंजुमन इशात ए तालीम या संस्थेची मिलिया नावाची शाळा आहे. याच शाळेत आमेर काझी नावाचा एक शिक्षक नोकरी करत होता. दरम्यान, काझी याने शाळेतील काही शिक्षिकांसोबत त्याच शाळेतील वर्गखोलीमध्ये अश्­लील कृत्य केले. धक्कादायक म्हणजे अश्­लील कृत्य करतानाचे व्हीडीओ देखील त्याने रेकोर्ड केले होते. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. याची गंभीर दखल घेत शाळा प्रशासनाने काही शिक्षिकांना निलंबित केले होते. तसेच काही शिक्षिकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र, असे असताना या प्रकरणातील मुख्य आरोपी आमेर काझीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे त्याला शाळा प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप होत होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR