परभणी : शहरात प्रथमच संपन्न होत असलेल्या बागेश्वर धाम (सरकार) प. पुज्य श्री धिरेंद्र कृष्ण शास्त्रीजी यांच्या हनुमंत कथेची जय्यत तयारी खा. संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. श्री सिताराम सेवा समितीचे सर्वसदस्य अहारोत्र परिरम घेताना दिसून येत आहेत.
सदरील कथा दि.११ ते १३ डिसेंबर दरम्यान पाथरी रोडवरील लक्ष्मी नगरीत ६५ एकर जमिनीवर संपन्न होत आहे. मुख्य मंडप जर्मन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात येणार असून १६५ बाय ७०० आकाराचा मंडप असेल. त्याच प्रमाणे मुख्य मंडपाच्या दोन्ही बाजुंनी १ लाख स्क्वेअर फुआचे पाईप मंडपही उभारण्यात येत आहेत. त्याच बरोबर कथेसाठी येणा-या भाविक भक्तांसाठी कथास्थळी ५० एलईडी स्क्रीन सुध्दा लावण्यात येणार आहे. या कथेसाठी येणा-या भाविकांच्या वाहनांची पार्कींग व्यवस्था (शिवपुराण कथे प्रमाणेच) केली जाणार आहे. यात बीड- पाथरी- मानवत-सेलूकडून येणा-या भक्तांसाठी कथा स्थळासमोर व बाजुला जवळपास १०० एकरावर तर परभणी शहर गंगाखेड-जिंतूर येणा-या भाविकांच्या वाहनाची व्यवस्था कॅनाल जवळील तीन पटागंणात करण्यात येणार आहे.
या कथे संदर्भात १० डिसेंबर रोजी सायंकाळी कलश यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच हनुमंत कथेला ११ डिसेंबरला दुपारी ३ ते ७ या वेळेत सुरूवात होणार आहे. १२ तारखेला दुपारी १२ वाजता दिव्य दरबार तर दि.१३ डिसेंबर रोजी समारोप होणार आहे. कथेसाठी येणा-या अलोट गर्दीमुळे भावीक भक्तांनी मौल्यवान वस्तु, दागीणे सोबत आणू नये. तसेच वृध्द महिलांनी कथा सुरू होण्यापुर्वीच स्थानापन्न होण्याचे आवाहन मुख्य मार्गदर्शक खा. संजय जाधव व श्री सिताराम सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.