पुर्णा : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव सिंहजी शेखावत गोगामेडी राजस्थान यांची काही अज्ञात समाजकंटकांनी गोळ्या घालुन हत्या केली. या घटनेचा निषेध करत ८ डिसेंबर रोजी पूर्णा तालूक्यातील सर्व राजपूत समाज बांधवांनी तीव्र निषेध करुन तहसिलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. शेखावत यांच्या हत्या करणा-यांना अपराध्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पूर्णा तालुक्यातील सर्व राजपूत समाज बांधवानी शेखावत निषेध करत ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले त्या नराधमांना शासनाने त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी व राजपूत समाजाच्या भावनांचा आदर करून राजपूत समाजाला न्याय द्यावा. अन्यथा पूर्ण राजपुत समाज रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.
यावेळी निवेदकावर राजपूत संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ.अजयसिंह ठाकुर, नरेंद्र राठोड, अॅड. गोविंद ठाकूर, कैलास ठाकूर, सुरजसिंह ठाकुर, कैलासिंह ठाकूर, आकाश ठाकुर, जयसिंग चंदन, गोविंद चव्हाण, अर्जुनसिंग ठाकूर, शैलेंद्रसिंह ठाकुर, श्यामसिंह चव्हाण, धनराज ठाकुर, किरण सिंह ठाकुर, भरत राणा, संभाजी मोरे, गुलाब सिंग ठाकूर, केशव मोरे, प्रमोद मोरे, जीवन चव्हाण, आदित्य मोरे, सुनील मोरे, शैलेंद्र ठाकूर, रितेश चव्हाण, सुरतसिंह ठाकुर आदींच्या स्वाक्षरी आहे. याप्रसंगी राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.