29.7 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeपरभणीखा. शिंदेंना पाथरीत दाखविले काळे झेंडे

खा. शिंदेंना पाथरीत दाखविले काळे झेंडे

परभणी : शिवसेनेचे नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात भर सभेत मराठा युवकांनी घोषणाबाजी केली. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी हातात काळे झेंडे घेऊन घोषणाबाजी करणा-यांंना स्टेजवर बोलावून घेत त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. परभणी जिल्ह्यातील पाथरीत शिवसेनेची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी ही घटना घडली. मराठा तरुणांच्या अनेक व्यथा आहेत. शिक्षण, नोकरी आदीसह अनेक व्यथा असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. संबंध मराठा समाजाचा विश्वास हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. त्यांनी शिवरायांची शपथ घेऊन सांगितले की मराठा आरक्षण देणार, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR