अमरावती : प्रतिनिधी
बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू आहे. त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली आहे. आज सकाळी त्यांना उलट्या झाल्या आहेत आणि त्यांना उठून बसण्यास त्रास होत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आज ऑनलाईन बैठक होणार असून शेतक-यांच्या कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्यावरच ते आंदोलन मागे घेतील, असे कडू यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. गेल्या पाच दिवसांपासून बच्चू कडू यांचे हे आंदोलन सुरू आहे. या पाच दिवसांत बच्चू कडू यांनी अन्नाचा कणही घेतला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. आज सकाळीच त्यांना उलट्या झाल्या. त्यांना उठून बसण्यासाठीही त्रास होत आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. बच्चू कडू यांचे कार्यकर्ते उपोषणस्थळी येत आहेत.
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. पाच दिवसांत बच्चू कडू यांनी अन्नाचा कणही घेतला नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. बच्चू कडू यांना उठून बसण्यास त्रास होत आहे. सकाळी सकाळी त्यांना उलट्याही झाल्याने तब्येत आणखीनच खालावली आहे. पाच दिवसांपासून पोटात अन्नाचा कणही नसल्याने त्यांचे वजन चार किलोंनी घटले आहे.
राजू शेट्टी भेटीला दाखल
दरम्यान, बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी अमरावतीत राज्यभरातून नेते येत आहेत. माजी मंत्री महादेव जानकर यांनीही बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी हे उपोषण स्थळी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये शेतक-यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. तर, बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्याने त्यांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
बच्चू कडू यांच्या मागण्या
शेतमालाला किमान दरावर २० टक्के अनुदान द्यावे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापन करून १० लाखांची आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या, दिव्यांग आणि विधवा महिलांना ६००० रुपये मानधन द्या, शहरासारखे ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान ५ लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना द्या, धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ लागू करा, धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत १३ टक्के आरक्षण द्या.