30.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमुख्य बातम्यागुजरातमध्ये २४२ प्रवाशांनी भरलेले विमान कोसळले 

गुजरातमध्ये २४२ प्रवाशांनी भरलेले विमान कोसळले 

लँडींग करताना प्लेन क्रॅश

अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळले असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. एअर इंडियाचे हे विमान असल्याचे समजते.

घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.  या विमानात २४२ प्रवासी होते . अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे.

अहमदाबादमधून विमानाने उड्डाण करताच अपघात झाला. या विमानात कर्मचा-यांसह एकूण २४२ जण असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेली आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. अहमदाबाद विमानतळावरुन विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळात मेघानीनगर परिसरात विमानाला अपघात झाला.

मेघानीनगर विमानतळापासून १५ किलोमीटर दूरवर आहे. अपघात होताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्याकडून आग विझवण्याचं काम सुरु आहे. सोशल मीडियावर विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. विमानाला अपघात होताच आग लागली. धुराचे लोट आसमंतात दिसू लागले. आपत्कालीन यंत्रणा सध्या अपघातस्थळी पोहोचलेल्या आहेत. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मेघानीनगर परिसराजवळ असलेल्या धारपूरमध्येही धुराचे लोट दिसत आहेत.

अपघातग्रस्त विमान एअर इंडियाचे आहे. बोईंग ड्रीमलायनर ७८७ विमान ११ वर्षे जुने असल्याची माहिती समोर आलेली आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानानं उड्डाण केलं. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाला. अपघात होताच विमानाने पेट घेतला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. आग काही प्रमाणात नियंत्रणात आलेली आहे. अपघातात विमानाचा एक पंख तुटला आहे. तो विमानापासून वेगळा झाला आहे.
अपघातात विमानाचे मोठे नुकसान झालेले आहे. विमानाचा बहुतांश भाग जळून भस्मसात झाला आहे. विमानानं एका इमारतीला धडक दिली. त्या इमारतीचंही मोठे नुकसान झाले आहे. विमानतळाजवळच रुग्णालय आहे. तिथल्या सगळ्या डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व डॉक्टरांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश देण्याच आलेले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR