नाशिक : कांदा निर्यातबंदी लागू करण्यात आल्यानंतर व्यापा-यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. त्यासाठी कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते. पंरतु नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजारसमित्यांमध्ये पुन्हा लिलावांना सुरुवात झाली. पण लिलाव जरी सुरु झाले तरी कांद्यांचे भाव मात्र घसरले. कांदा निर्यातबंदी निर्णयाच्या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून कांद्याचे बंद असलेले लिलाव शेतक-यांच्या मागणीनुसार आज सुरू झाले.पण कांद्याचे भाव घसरल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्ग चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कांद्याला सरासरी १९०० ते २००० रुपये भाव मिळाल्याने शेतक-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सोमवार ११डिसेंबर रोजी लालसगाव बाजार समितीमध्ये ४०० वाहनातून सहा ते सात क्विंटल कांद्याची आवाक झाली होती. कांद्याला जास्तीत जास्त २६६१ रुपये म्हणजेच सरासरी १९०० रुपये तर कमीत कमी ८०० रुपये इतका प्रतिंिक्वटल भाव मिळाला. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी यावेळी कांदा उत्पादक शेतक-यांनी केली आहे.
सहकार विभागाच्या निर्देशांनतर कांदा लिलाव सुरु
सलग तीन दिवस कांदा लिलाव बंद ठेवले तर परवाना रद्द करण्यता येईल असे निर्देश सहकार विभागाकडून देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर व्यापा-यांनी पुन्हा कांद्यांचे लिलाव सुरु केलेत. सर्व जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव बंद झाल्यानंतर सहकार विभागने सर्व जिल्ह्यांच्या स्तरावर हा निर्णय घेतला होता. त्यातच नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याचे व्यवहार बंद असल्याचे निरीक्षण सहकार विभागाने नोंदवले होते.