नागपूर : अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरेंनी ३७० कलम हटवण्याची मागणी केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते स्वप्न पूर्ण केलं, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पण ज्यावेळी मोदी हे स्वप्न पूर्ण करत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांची भूमिका राज्य सभेत वेगळी, इतर ठिकाणी वेगळी होती, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवणारी लोक आहोत, ते असंभव होते, ते मोदींनी संभव करुन दाखविले त्यामुळे आपण येत्या काळाची वाट पाहावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला वैध ठरवले. त्यानंतर या निर्णयावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान कोर्टाच्या निर्णयाने कोणलाही आता शंका येणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.