24.8 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeधाराशिवकळंब येथे आठ जणांची तीघांना घरात घुसून मारहाण

कळंब येथे आठ जणांची तीघांना घरात घुसून मारहाण

धाराशिव : प्रतिनिधी
कळंब शहरातील कल्पनानगर येथे आठ जणांनी घरात घुसून तीघांना मारहाण केली. ही हाणामारीची घटना १० डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी प्रभाकर खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ८ जणांच्या विरोधात कळंब पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब शहरातील कल्पनानगर येथे राहणारे प्रभाकर शंकर खंडागळे यांच्या घरात १० डिसेंबर रोजी आठजण शिरले. मागील भांडणाच्या कारणावरून आरोपी किशोर शिवाजी चांदणे, सोजरबाई शिवाजी चांदणे, अभिजीत बिभीषण क्षिरसागर, विनायक मेटे, रामहारी मोतीराम खंडागळे (सर्व रा. लातूर), शालनबाई तेलंगे रा. लिंगीपिंपळगाव ता. वाशी, शंकर प्रभाकर खंडागळे, वर्षा शंकर खंडागळे (रा. कल्पाननगर, कळंब) यांनी प्रभाकर शंकर खंडागळे यांना मारहाण केली. आरोपींनी लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले.

प्रभाकर खंडागळे यांचा मुलगा व नातू हे दोघे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तुम्ही जर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुमच्यावर विनयभंगाची खोटी केस दाखल करु अशी धमकी दिली. या प्रकरणी प्रभाकर खंडागळे यांनी दि. रविवारी दि. १० डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम ४५२, ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ भा.दं.वि.सं. सह कलम २४ सिनीअर सिटीझन अ‍ॅक्ट २००७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR