28.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरपरभणी येथील सुर्यवंशींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा

परभणी येथील सुर्यवंशींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा

उच्च न्यायालयाचे आदेश पोलिसांना मोठा धक्का

छ. संभाजीनगर : परभणी येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणा-या शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात आता पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा १६ डिसेंबर २०२४ रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात आता पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा १६ डिसेंबर २०२४ रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तसेच सोमनाथचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे न्यायदंडाधिका-यांच्या अहवालात म्हटले आहे. सोमनाथच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचेही अहवालातून पुढे आले आहे.

प्रकरणाचा सीआयडी तपास सुरू
आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात होतीच. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात कुटुंबीयांची बाजू वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे मांडत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR