28.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रशहांसमोर एकनाथ शिंदेंचा ‘जय गुजरात’चा नारा

शहांसमोर एकनाथ शिंदेंचा ‘जय गुजरात’चा नारा

पुणे : आज मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एक टीम बनून काम करत आहोत. या राज्याला पुढे घेऊन जात आहोत. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. अशीच एकजूट मजबूत ठेवा. या राज्याच्या विकासात आपलही योगदान आहे. आपल्याला उद्योग, व्यवसायात कुठली अडचण येणार नाही असा विश्वास व्यक्त करतो असे एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी अमित शाहंसाठी त्यांनी एक खास शेर म्हटला. भाषण संपवताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरातचा नारा दिला.

आजचा दिवस पुन्हा गुजराती समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे. इथे कुठस्या गोष्टीची कमतरता नाही. कारण तुम्ही सर्व लक्ष्मीपुत्र आहात. त्यामुळे काही कमी पडण्याचा प्रश्नच येत नाही. मोदीजी ज्या कार्याचे भूमिपूजन करतात ती काम वेगवान गतीने पूर्ण होतात. मी आपला अनुभव सांगतोय, समृद्धी हायवे असो, कोस्टल रोड असो अशी अनेक उदाहरण आहेत. त्यांचे भूमिपूजन आणि उद्घाटन दोन्ही मोदीजींनी केले. या वास्तूच भूमिपूजन मोदीजींनी केले. पण लोकार्पण अमित भाईंच्या हस्ते होतय असे एकनाथ शिंदे म्हणाले. ते कोंढवा बुद्रुक येथे जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात अमित शाह यांचे भरभरुन कौतुक केले.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह आमच्यासाठी वेगळे नाहीत. मोदीजींची सावली म्हणजे अमितभाई आहेत. अमित शाहांचा स्पर्श झाल्यानंतर त्या कार्याचे सोने होते. तुम्ही सर्व लक्ष्मीपुत्र आहात. आंनंद दिघे साहेबांचे शब्द मला आठवतात. कुठलही शहर असो, गहसंकृल असो, त्या शहराला बाजारपेठ नसेल तर शोभा वाढत नाही. व्यवसाय, बाजारपेठ बनवणारे तुम्ही लोक आहात. तुम्ही व्यापारी आहात. तुमच्याशिवाय कुठल्या शहराची शोभा वाढत नाही अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.

अमित भाई आव्हानाला ते संधी समजतात
या सेंटरचा भविष्यात अजून विस्तार होईल. अमित भाई राष्ट्रहिताल पहिले प्राधान्य देतात. आव्हानाला ते संधी समजतात. त्यांच्या कार्यशैलीत दृढता, संकल्प आहे. नव्या भारताच्या निर्माणात मोदींसोबत त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. अमित भाई कुशल रणनितीकार आहेत. त्यांच्या रणनितीने नेतृत्वाने अशक्य ते शक्य करुन दाखवले. काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय असो. अमित शाहंनी राष्ट्रहिताला नेहमी वरती ठेवले असे असं कौतुक करताना एकनाथ शिंदे म्हणाले. अमित शाह चट्टानासारखे माझ्यामागे उभे होते’ भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांचे उज्ज्वल भविष्याच स्वप्न आहे. मला स्वत:ला अनुभव आहे. २०२२ साली तुम्हाला माहित असेल, या राज्यात मंदिरे, बाजारपेठा सगळे बंद होते. सगळे स्पीड ब्रेकर होते. त्यावेळी सर्वसामान्यांच सरकार आणण्याची गरज होती. मोदीजींच मार्गदर्शन होतच. पण अमित शाह चट्टानासारखे माझ्यामागे उभे होते. काम सोपे नव्हते. राज्याच्या विकासाची विषय येतो, तेव्हा अशी पावल उचलावी लागतात असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR