बिजींग : वृत्तसंस्था
चीनमध्ये मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कदाचित चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग कायमचे सत्तेबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनमध्ये सारे काही आलबेल असल्याचे दाखविले जात असले तरी जिनपिंग यांचे १६ दिवस गायब होणे आणि नंतर सार्वजनिक कार्यक्रमांतून न दिसणे बरेच काही सांगून जात आहे.
२४ सदस्यांच्या शक्तिशाली पॉलिटब्युरोचे सदस्य असलेले झांग यांना माजी चीनी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांच्याशी निष्ठावंत राहिलेल्या सीसीपीच्या वरिष्ठ सदस्यांचा पाठिंबा आहे. हे लोक जिनपिंग यांच्यापेक्षा कमी कट्टरवादी आहेत.
गेल्या दीड महिन्यापासून चीनमध्ये वातावरण बदलले आहे. चीनच्या पिपुल्स लिबरेशन आर्मीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. महत्वाची क्षेत्रे आर्थिक मुद्यावर झगडत आहेत, यामुळे जिनपिंग यांच्यासमोर मोठे आव्हान होते, त्यात आता सत्तापालट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या काळात जे परदेशी नेते दौ-यावर येत आहेत, त्यांच्याशी चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि उपपंतप्रधान हे लाइफेंग भेट घेत आहेत.
महत्वाचे म्हणजे येत्या ६-७ जुलैला ब्राझिलच्या रियो-दी-जानेरोमध्ये होत असलेल्या ब्रिक्स देशांच्या बैठकीलाही जिनपिंग जाणार नाहीत. गेल्या दोन आठवड्यांपासून जिनपिंग पुन्हा बेपत्ता झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही आठवड्यांपूर्वीच सम्राट शींचा शेवट होणार अशी भविष्यवाणी केली होती. ६ जूनला चीनच्या राज्य परिषदेतील ५० हून अधिक मंत्री आणि उच्च अधिका-यांनी निष्ठेची शपथ घेतली, तेव्हा जिनपिंग उपस्थित नव्हते हे उल्लेखनिय ठरते.