28.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeसोलापूरपंढरपूर तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वुमेन प्रोटेक्शन ॲक्शन कमिटी स्थापना करा : अस्मीता गायकवाड

पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वुमेन प्रोटेक्शन ॲक्शन कमिटी स्थापना करा : अस्मीता गायकवाड

सोलापूर : पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वुमेन प्रोटेक्शन ॲक्शन कमिटी स्थापना करा . अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौ अस्मिता गायकवाड यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली.

पंढरपूर ही भारताची दक्षिणकाशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशीला तिथे सर्वात मोठी यात्रा भरते महाराष्ट्रासह आंध्र कर्नाटक तेलंगाना याशिवाय इतर प्रांतातून ही या तीर्थक्षेत्राला लाखोच्या संख्येने भाविक येत असतात यंदाही पंढरपूर आषाढी एकादशीला सुमारे वीस लाख भाविक येण्याचा अंदाज आहे यामध्ये महिला वर्गांची ही मोठ्या प्रमाणात समावेश असणार आहे नुकतीच पंढरपूर यात्रेसाठी येणाऱ्या एका तरुणीवर अत्याचार झाल्याचे घटना दौंड येथे घडले आहे.. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर वर आला आहे.

अनेक महत्त्वांच्या प्रमुख दिंड्याचे आगमन सोलापूर जिल्ह्यात झाले आहे त्यामुळे महिला सुरक्षिततेकरिता प्रमुख रस्त्यांवर प्रत्येक दहा किलोमीटर अंतरावर वुमन प्रोटेक्शन ॲक्शन कमिटीची स्थापना करणे गरजेचे आहे. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन विनयभंगा अत्याचार या घटनांना आळा बसेल महिलांच्या तक्रारी कडेही संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे.

प्रमुख मार्गांवर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याग्रस्त वाढवावी या गर्दीचा फायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची दक्षता घ्यावी वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवून वारकऱ्यांची सुरक्षितता याचीही योग्य ती काळजी प्रशासनांकडून घेण्यात यावी वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा बोल वाला नुसत्या कागदांवर न राहता त्या प्रत्यक्षात वारकऱ्यांना प्रत्यक्षात पुरवल्या जाव्यात. अशा अनेक मागण्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते अस्मिता ताई गायकवाड यांनी केल्या.. आणि त्यांची तात्काळ अंमलबजावणी व्हायला व्हावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्याकडे त्यांनी लेखी निवेदन दिले.

यावेळी त्यांच्या समवेत लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला शिवडशेट्टी.. उपजिल्हा संघटिका सुनिता लोंढे, ज्योती माळवतकर. शहर संघटिका प्रीती नायर, स्वाती रुपनर, जोहरा बेगम रंगरेज , अनिता राठोड आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR