28.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयरशियाचा युक्रेनवर हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जखमी

रशियाचा युक्रेनवर हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जखमी

कीव : वृत्तसंस्था
रशियाने युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाला आणि किमान २६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने हल्ल्याच्या सुरुवातीला ५५० ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला, ज्यामुळे कीवमधील अनेक भागांमध्ये मोठा विध्वंस झाला आहे.

रशियाच्या या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनचे हवाई संरक्षण मजबूत करणे, संभाव्य शस्त्रास्त्रांची तयारी आणि युद्ध संपवण्यावर चर्चा केली. यावेळी ट्रम्प म्हणाले, आम्ही बरीच चर्चा केली, पण युद्ध कधी संपेल हे सांगता येत नाही.

झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेन आपला शस्त्रास्त्र उद्योग मजबूत करण्यासाठी योजना बनवित आहे, पण त्यासाठी काही वेळ लागेल. रशियाचे हवाई दल ११ क्षेपणास्त्रांची आणि शाहेद ड्रोनचा वर्षाव करत होते. डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यातही फोनवर चर्चा झाली. रशियाने केलेल्या या हल्ल्यामुळे युक्रेनच्या स्थितीवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR