बंगळूरू : भारतातील सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसने कर्मचा-यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करण्यास सांगितले आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी उत्पादकता आणि आर्थिक वाढीसाठी कर्मचा-यांनी आठवड्यातून ७० तास काम करण्याची गरज वारंवार नमूद केल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अहवालानुसार, सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने कर्मचा-यांना आठवड्यातून किमान ३ दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे. या अगोदर कंपनीने कर्मचा-यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितले होते. परंतु याला कर्मचा-यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे इन्फोसिसने म्हटले आहे की, कोविड -१९ च्या आजारानंतर तीन वर्षे घरातून काम काम करणे पुरेसे होते. यापूर्वी विप्रोनेही आपल्या कर्मचा-यांना तीन दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितले होते आणि तसे न केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला होता. विप्रोनेही आठवड्यातून तीन दिवस ऑफिसमध्ये येणे बंधनकारक केले आहे. अहवालानुसार विप्रोने ७ जानेवारीपासून कारवाईचा इशारा दिला आहे. भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा फर्म टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने देखील कर्मचा-यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे. कंपनीने कर्मचा-यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसमधून काम करण्यास सांगितले आहे.
इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी नीलांजन रॉय यांनी राजीनामा दिला आहे. त्याच वेळी आयटी सेवा प्रमुख इन्फोसिसने जयेश संघराजका यांची नवीन सीएफओ म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. निलांजन रॉय ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनी सोडतील. त्यांच्या जाण्यानंतर, जयेश संघराजका १ एप्रिल २०२४ पासून या पदाची सूत्रे स्वीकारतील. इन्फोसिसने एका निवेदनात म्हटले आहे की, २०१८ मध्ये या पदावर नियुक्त झालेल्या रॉय यांनी इन्फोसिसच्या बाहेर वैयक्तिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.