मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी तिरुअनंतपुरममधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. 35 वर्षीय अभिनेत्रीने गळफास घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ती तिचा पती आणि अभिनेता मनोजसोबत त्या फ्लॅटमध्ये राहत होती. ती आर्थिक संकटातून जात असल्याचं बोललं जात आहे. आत्महत्येची प्राथमिक माहिती असली तरी तिच्या मृत्यूचा तपास पोलीस करत आहेत.
सोमवारी रेंजुशाने सकाळी बराच वेळी बेडरुमचा दरवाजा न उघडल्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली होती. त्यांनी जबरदस्ती खोलीचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडला तेव्हा रेंजुशाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलीस या प्रकरणी चौकशी करत असून रेंजुशाच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
कोचीची राहणारी अभिनेत्री मंजुषाने टीव्ही मालिकांमध्ये येण्यापूर्वी टीव्ही शो अँकर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने ‘स्त्री’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर अभिनयाची सुरुवात केली.टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमधील तिच्या सहाय्यक भूमिकांसाठी ती प्रसिद्ध होती. या भूमिकांमुळे ती घराघरात पोहोचली. ज्याने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
‘सिटी ऑफ गॉड’, ‘मेरीकुंडोरू कुंजाडू’, ‘बॉम्बे मार्च’, ‘कार्यस्थान’, ‘वन वे तिकीट’, ‘अथभूता द्विपू’ यासह अनेक टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमधील तिच्या सहाय्यक भूमिकांसाठी रेंजुशा प्रसिद्ध आहे. ‘मनोरमा’ने दिलेल्या माहितीनुसार, रेंजुशा गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत होती. तिने मल्याळम चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त टेलिव्हिजन मालिकांसाठी लाइन प्रोड्युसर म्हणूनही काम केलं आहे.
रेंजुशा ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच काही मल्याळम चित्रपटांमध्येही ती दिसली होती. ‘सिटी ऑफ गॉड’, ‘मैरीकुंडोरु कुंजाडु’ या चित्रपटांमध्ये ती दिसली होती. तिच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.