रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर येथील रेणुका शेतकरी खरेदी विक्री संघावर बिनविरोध निवडून आलेल्या नूतन संचालक मंडळाने माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा रेणापूर तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष अॅड प्रमोद जाधव यांच्यासह रेणुका खरेदी विक्री संघाचे नूतन संचालक माणिक सोमवंशी, संचालक रमेश पाटील,जाकीर शेख, प्रकाश जाधव,आनंद कातळे, महादेव भिंगे, माधव चंबुले, नारायण आंबेकर, अशोक पाटील, ललिताताई भिसे,अण्णासाहेब कसबे यांच्यासह रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती शेषराव हाके, सुरेश लहाने, रेणा साखर कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, स्रेहल देशमुख, सतीश पाटील, प्रभाकर केंद्रे, सुग्रीव मुंडे, प्रदीप गौड ,भास्कर खाडप, हनुमंतराव पवार, पद्मसिंह पाटील, प्रदीप राठोड, प्रकाश सूर्यवंशी यांच्यासह रेणापूर तालुक्यांतील काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.