लातूर : प्रतिनिधी
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रिपाइं (खरात) तर्फे निषेध करण्यात आला. रिपाइं (खरात) पक्षाचे सचिन खरात यांनी अपोलो हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी विजयकुमार घाडगे-पाटील यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. महाराष्ट्रात जातीजातीमध्ये भांडणे लावण्याचा कोणीतरी जाणिवपूर्वक प्रयत्न करीत आहे, असा आरोप यावेळी सचिन खरात यांनी केला.
संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायवाड यांच्यावर शाई फेकण्यात आली, विधीमंडळात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. महाराष्ट्रात नेमके चालले काय?, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे, असे सचिन खरात यांनी नमुद करुन विजयकुमार घाडगे यांच्यावर हल्ला करणा-या ११ आरोपींना तात्काळ अटक करुन विजयकुमार यांना मारण्याचा कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
















