25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रअपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारक-यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारक-यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा जखमी वारक-यांच्या उपचारांचा खर्चही सरकार करणार

नागपूर (प्रतिनिधी) : आळंदीला जाणा-या दिंडीत कंटेनर घुसून झालेल्या अपघातात ४ वारक-यांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये मदत देण्यात येईल तसेच जखमी झालेल्या वारक-यांच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिक वारी सोहळ्यासाठी शिर्डीवरून आळंदीकडे येणा-या दिंडीत भरधाव कंटेनर शिरल्याने ४ वारक-यांचा मृत्यू झाला तर ८ वारकरी जखमी झाले होते. नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी परिसरात हा अपघात घडला होता. या अपघातासंदर्भात काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत हा विषय उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातात मृत्यू पडलेल्या वारक-यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR