करमाळा (प्रतिनिधी)
करमाळा शिवसेना शहर प्रमुख पदी नागेश गुरव यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचेपत्र शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य माजी आमदार कृष्णा भेगडे व सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी दिले.
नागेश गुरव तीस वर्षापासून शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
सेनेचे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव दिवंगत नेते एडवोकेट शिवाजीराव मांगले यांच्यासोबत त्यांनी करमाळ्यात शिवसेना मजबूत करण्याचे काम केले होते.सध्या ते करमाळा उपशहर प्रमुख म्हणून कार्यरत होते.खोलेश्वर आरती मंडळाचे ते अध्यक्ष असून या मंडळाचे १०० सदस्य आहेत.
नागेश गुरव यांच्या नियुक्तीमुळे जुन्या शिवसैनिकांना न्याय मिळाला अशी भावना शिवसैनिकातून व्यक्त केली जात आहे.पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत नागेश गुरव यांचा प्राध्यापक शिवाजीराव सावंत जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी यांनी सत्कार केला यावेळी करमाळा विधानसभा शिवसेना अध्यक्ष राहुल कानगुडे उप तालुकाप्रमुख दादा थोरात उप तालुका प्रमुख नवनाथ गुंड शिवसेनेच्या महिला जिल्हा उपप्रमुख ज्योती वाघमारे, पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय सावंत आदी उपस्थित होते.
नियुक्ती झाल्यानंतर बोलताना नागेश गुरव म्हणाले की शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहरातील सतरा वार्डात सतरा शाखा तयार करून घर तेथे शिवसैनिक व शिवदूत हा उपक्रम राबवणार आहे.करमाळा नगरपालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती या वेळेस नागेश गुरव यांनी दिली.