17.7 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रगोगावले यांचे विधान महाराजांचा अवमान करणारे

गोगावले यांचे विधान महाराजांचा अवमान करणारे

संजय राऊत यांचा गोगावलेंवर हल्लाबोल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते. तिथले वातावरण चांगले आहे. त्यामुळे मीही सुरतला गेलो होतो, अशी साक्ष शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी दिली होती. विधानसभा अध्यक्षांसमोर काल गोगावले यांची साक्ष झाली. यावेळी वकील देवदत्त कामत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोगावले यांनी ही साक्ष दिली होती. विरोधकांनी गोगावले यांचे हे विधान शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे असल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या विधानावरून गोगावले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

भरत गोगावले यांचे हे विधान म्हणजे शिवाजी महाराजांचा अवमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते. ते ब्रिटिशांना ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणा-या गुजराती मंडळाच्या वखारी लुटण्यासाठी. तुम्ही महाराष्ट्र लुटायला तिकडे गेला. तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या. शिवाजी महाराज गुवाहाटीला गेले नव्हते. शिवाजी महाराज सुरतेवरून गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते, अशी खवचट टीका संजय राऊत यांनी केली आहे.

गद्दारी आणि बंड यात फरक आहे
गद्दारी आणि बंड यात खूप फरक आहे. गद्दारांनी शिवाजी महाराजांशी स्वत:ची तुलना करू नये. जे खरे बंडखोर असतात ते देशासाठी आणि राज्यासाठी बंड करतात. त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव घ्यावे, असे राऊत म्हणाले.

यांनी कुणाचे नाक कापले? : अंबादास दानवे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही भरत गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाजी महाराज इंग्रजांच्या वखारी लुटायला गेले होते. त्यांनी कोणाचे नाक कापले. पन्नास खोक्यांसाठी पळून गेले नव्हते. हे तर गद्दारी करून गेले. शिवाजी महाराज यांची बरोबरी करणारे कोण गोगावले? शिवाजी महाराज यांच्या नखाची बरोबरी करू शकत नाहीत. हे तर खंडूजी खोपडे, गणोजी शिर्के ,आणि सूर्याजी पिसाळ आहेत, असा हल्ला अंबादास दानवे यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR