बोस्टन : प्रतिनिधी
अमेरिकेतील बोस्टन शहरात नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स (एनसीएसएल) पार पडली. त्यामध्ये भारतातील २४ राज्यातील १३० हून अधिक विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे आतापर्यंतचे हे सर्वात मोठे शिष्टमंडळ ठरले आहे.
‘एनसीएसएल’ भारताचे संस्थापक डॉ. राहुल कराड यांनी अमेरिकेतील या लोकशाही बळकट करण्याच्या प्रयत्नावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की हे केवळ शिष्टमंडळ नव्हते; तर भारतीय लोकशाहीची शक्ती आणि विविधतेतील एकतेचे जिवंत प्रतिक आहे. भारतातातील विविध राज्यातील कायदेमंडळातील हे प्रतिनिधी जगभरातील ७,००० हून अधिक प्रतिनिधींशी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), आरोग्य, वाहतूक आणि जागतिक प्रशासन यासारख्या विषयांवर संवाद साधत आहेत. भारतीय लोकशाहीसाठी हे नवीन पर्व आणि अभिमानाचा क्षण आहे. भारताने विविध जागतिक मंचावर दहशतवादाविरोधातील आवाज मजबूत केला आहे. भारताने नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स समिटमध्ये पण दहशतवादाविरोधात ठोस भूमिका मांडली.
दहशतवादविरोधात आवाज : भारताने विविध जागतिक मंचावर दहशतवादाविरोधातील आवाज मजबूत केला आहे. भारताने नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स समिटमध्ये पण दहशतवादाविरोधात ठोस भूमिका मांडली. उत्तर प्रदेशमधील बांसगाव मतदारसंघातील भाजप आमदार विमलेश पासवान यांनी दहशतवादाविरोधात आवाज उठवला. गोळ्या आणि बंदुकीने दहशतवादाची भाषा सुरु होते; तर संवाद, सहअस्तित्व आणि धैर्याने मानवता समोर येते असे त्यांनी स्पष्ट केले.