25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूर'हुतात्मा'चे डबे कमी केल्याने प्रवाशांना फटका

‘हुतात्मा’चे डबे कमी केल्याने प्रवाशांना फटका

सोलापूर  – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने सोलापूरकरांच्या हक्काची असलेल्या हुतात्मा एक्स्प्रेसचे तीन सेकंड सिटींग (डी ११ ते डी १३) कायमस्वरूपी कमी करून त्या जागी दोन स्लिपर (एस १ आणि एस २) तसेच एक एसी ३ टायर इकॉनॉमी डबे लावण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा ३०० प्रवाशांना फटका बसणार आहे.

हा निर्णय १५ डिसेंबरपासून लागू होणार आहे. हुतात्मा एक्स्प्रेसला दररोज वेटिंग लागत असून तीन डबे कमी करण्याचा निर्णय कोणी, कशासाठी घेतला. पुणे-अमरावती एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी सोलापूरकरांवर अन्याय झाला आहे. पुणे – अमरावतीबरोबर असणारा रेक शेअरिंग तोडावा आणि हुतात्मा एक्स्प्रेस सोलापूर-पुणे – सोलापूर एवढीच सोडावी, अशी मागणी सोलापूरकरातून होत आहे.
प्रवाशांची मागणी आणि सुविधांसाठी मध्य रेल्वेच्या गाडी क्र. १२१५८ आणि १२१५७ सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसच्या कोच संरचनेत बदल करण्यात आला आहे. एक स्लीपर, एक एसी, तीन टायर इकॉनॉमी डब्यात वाढ तर तीन नॉन एसी चेअर कारमध्ये कमी करण्याचा निर्णय रेल्वे
प्रशासनाने घेतला आहे.

याशिवाय गाडी क्र. ११०२५ पुणे-अमरावती एक्स्प्रेस, गाडी क्र. १२११९ अमरावती-अजनी एक्स्प्रेसच्या कोच संरचनेत बदल करण्यात आला आहे. सध्या जनरल एक, स्लीपर एक, एस चेअर कार एक, नॉन एसी चेअर कार १३ आणि गार्ड ब्रेकयान एक असे एकूण १७ कोच असलेल्या या गाड्यांमध्ये जनरल एक, स्लीपर दोन, एसी चेअर कार एक, नॉन एसी चेअर कार १०, एसी तीन टायर इकॉनॉमी एक आणि गार्ड ब्रेक यान एक असे एकूण १६ कोच असणार आहेत. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR