16.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeलातूरशिक्षण संस्थेच्या संचालकासह प्लॉट खरेदीदीरांवर गुन्हे दाखल

शिक्षण संस्थेच्या संचालकासह प्लॉट खरेदीदीरांवर गुन्हे दाखल

निलंगा : प्रतिनिधी

तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकावर संस्थेच्या मालकीच्या जमीनीची खोटे लेआउट बनवून प्लॉट पाडून विक्री केली . व ती रक्कम खात्यात जमा केली नाही म्हणून न्यायालयाच्या आदेशाने या ८ संचालक व ४ खरेदीदारावर विविध कलमान्वये औराद शहाजानी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील पोलिस ठाण्यात फिर्यादी सुंदरलाल दरक यांनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या फिर्यादीवरून प्रेमचंद बियाणी, मडोळ्या मठपती, दगडु गिरबने, रमेश बगदुरे, राजेश वलांडे, मतीन आळंदकर, किशन भिंगोले, शिवाजी जाधव या संचालकांसह प्लॉट खरेदीदार बालाजी सूर्र्यवंशी, राम मरगणे, अरंिवंद ठाकूर, चुनगुद ठाकूर यांच्यावर तर एका फिर्यादीवरून भादवी कलम ४०६, ४०९, ४२०, १२० ब ३४ तर दुस-या फिर्यादीवरून याच कलमात ४६८, ४७२ ही कलमे वाढवून संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR