लातूर : प्रतिनिधी
मांजरा परिवाराचे कुटुंबप्रमुख व मार्गदर्शक माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण येथे पाण्याचे जलपूजन व्हाइस चेअरमन अशोक काळे व संचालकांच्या हस्ते करण्यात आले.
विकासरत्न विलासराव देशमुख यांनी उभारलेल्या बराजेस््मुळे शेतक-यांच्या जिवनात आमुलाग्र बदल घडून आला आहे. शेतीला पाणी आवश्यकतेनुसार मिळत असल्याने ऊस व अन्य पिकांच्या माध्यमातून आर्थिक परिवर्तन आपल्या भागात घडून आले आहे. मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख हे साखर कारखानदारीला योग्य दिशा व मार्गदर्शन करत असल्याने व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने साखर उद्योगात होत असलेले कार्य देशभरात गौरवले जात आहे.
मुबलक पाणी, वेळेवर ऊसाचे गाळप व गरजेनुसार तत्परतेने कर्ज मिळत असल्याने सहकार क्षेत्र मजबूत स्थितीत आहे. सिंचनाची व्यवस्था सक्षम असल्याने हे सर्व आर्थिक परिवर्तन होत आहे. यामुळेच कृतज्ञता व्यक्त करत विकसरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याकडून मांजरा धरण येथे जलपुजन करण्यात आले. यावेळी संचालक तथा शेतकी कमिटीचे चेअरमन कैलास पाटील, संचालक तात्यासाहेब देशमुख, सदाशिव कदम, दयानंद बिडवे, सचिन शिंदे, श्रीकृष्ण काळे, अनिल दरकसे, बाळासाहेब पांढरे, वसंत उपाडे, मदन भिसे, ज्ञानेश्वर पवार, निळकंठ बचाटे, शंकर बोळंगे, अरुण कापरे, एस. आर. पाटील, उपस्थित होते.