26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयसंसद हल्ला प्रकरणी मनोरंजन डी. मास्टरमाईंड?

संसद हल्ला प्रकरणी मनोरंजन डी. मास्टरमाईंड?

नवी दिल्ली : लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसदेत घुसखोरी करून स्मोक कँडलचा धूर पसरवणा-या आणि गोंधळ घालणा-या चौघांना बुधवारी अटक करण्यात आली. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. चौकशीदरम्यान, चौघांनीही खुलासा केला की, आम्हाला संसदेच्या कामकाजात शेतकरी, बेरोजगारीचा मुद्दा, मणिपूरचा मुद्दा याकडे सरकारचे लक्ष वेधायचे होते. आतापर्यंतच्या तपासात या चौघांचाही मास्टरमाईंड समोर आलेला नाही, परंतु संश;यत मास्टरमाईंड म्हणून मनोरंजन डी. यांचे नाव पुढे येत आहे.

दरम्यान, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनोरंजन डी. हा मास्टरमाईंड असण्याची शक्यता आहे. त्याने इतरांना त्याच्या कार्यात सामील होण्यास प्रवृत्त केले होते. मनोरंजनला नीलमनेच भर्ती केले होते. गेल्या वर्षी भरती झाली होती. मनोरंजनची कार्यपद्धती ही नक्षलवाद्यांसारखी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हे शहरी नक्षलवादाचे क्लासिक प्रकरण असल्याचे दिसत असल्याची माहिती समजते.

मनोरंजन त्याचा मोबाईल फोन आणि सोशल मीडिया तपशील शेअर करण्यास नकार देत आहे. संयुक्त चौकशी दिवसभर सुरू राहणार आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. ज्यामध्ये विशेष आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, ५ डीसीपी, ७ एसीपी आणि २० हून अधिक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

आरोपी चंदिगढमध्ये पहिल्यांदा भेटले
संसद भवनाच्या आत आणि बाहेर कट रचणा-या आरोपींची सर्वांत प्रथम भेट चंदिगढमध्ये झाली होती. चंदिगढ येथील भगतसिंग विमानतळाच्या मुद्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान ही बैठक झाली होती. त्यानंतर हे आरोपी अनेकदा विशालच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी भेटले. विशाल आणि विशालची पत्नी वृंदा शर्मा यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.

आरोपी विशालला घेतले ताब्यात
आरोपींना वाढती बेरोजगारी, शेतक-यांच्या मागण्या, अग्निवीर आणि वन रँक वन पेन्शनचा मुद्दा उपस्थित करायचा होता. या सहाही आरोपींमागे काही राजकीय संरक्षण आहे का? या दिशेनेही चौकशी सुरू आहे. आरोपी विशालला त्याच्या राहत्या घरातूनच ताब्यात घेण्यात आले. आरोपी ललित झा याचा स्पेशल सेलच्या पथकाकडून शोध सुरू आहे, त्याला लवकरच अटक केली जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR