28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपोषण आहाराच्या गव्हामध्ये बुरशी नि जाळे!

पोषण आहाराच्या गव्हामध्ये बुरशी नि जाळे!

वर्धा : स्तनदा मातांना देण्यात येणा-या पोषण आहाराच्या गव्हामध्ये बुरशी आणि जाळे लागलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील तळेगाव श्यामजी पंत येथे एका अंगणवाडीमधून हे गहू वितरीत करण्यात आले. लाभार्थ्याने सीलबंद पाकीट घरी आणून उघडल्यावर गव्हाला दुर्गंधी सुटली होती. पोषण आहाराचा दर्जा इतका निकृष्ट कसा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

तळेगाव श्यामजी पंत येथील अंगणवाडी क्रमांक ३६मध्ये स्तनदा मातेचा आहार घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेला देण्यात आलेला गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. योगेश लोणारे यांच्या घरी आलेल्या पोषण आहाराच्या पाकिटात हा प्रकार आढळला. गव्हाला दुर्गंधी सुटली असून गव्हामध्ये मोठ्या गाठी बनलेल्या आढळून आल्या.

सोबतच हा गहू पूर्णत: काळा पडला आहे. वारंवार पोषण आहाराचे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे येत असून वरिष्ठांना सूचना देऊनही यावर कोणतीच कारवाई होत नाही. स्तनदा मातेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देण्यात आलेल्या आहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप उटाणे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR