28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीयज्यो बायडेन यांच्यावर महाभियोग चालणार

ज्यो बायडेन यांच्यावर महाभियोग चालणार

वॉशिंग्टन : अमेरिकेतून मोठी राजकीय घडामोड आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. संसदेत ज्यो बायडन यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावाच्या समर्थनार्थ २२१ मते पडली, तर विरोधात २१२ मते पडली. दरम्यान, ज्यो बायडन यांच्यावर त्यांचा मुलगा हंटर बायडन यांच्या वादग्रस्त आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या आधारे औपचारिक महाभियोगाची चौकशी सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाने हा निर्णय निराधार असल्याचे म्हटले आहे.

रिपब्लिकन पक्षाने अद्याप राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या विरोधात कोणतेही खरे तथ्य मांडलेले नाही. महाभियोगाचा कोणताही फायदा होणार नाही, कारण अमेरिकन संसदेचे वरचे सभागृह सिनेटमध्ये जाताच हा प्रस्ताव पडू शकतो. तेथे डेमोक्रॅट पक्षाची संख्या अधिक आहे. दरम्यान असे असले तरी महाभियोग प्रस्ताव २०२४ च्या निवडणुकीत ज्यो बायडन यांच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. महाभियोग प्रस्तावाबाबत ज्यो बायडन यांनी रिपब्लिकन पक्षावर निशाणा साधला आहे. या महाभियोग प्रस्तावाला एक राजकीय स्टंट असल्याचे सांगत ज्यो बायडन यांनी निराधार असल्याचे म्हटले आहे. ज्यो बायडन म्हणाले की, देश आणि जगासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्राधान्यक्रमांवर कारवाई करण्यासाठी अमेरिकन लोकांना काँग्रेसमधील त्यांच्या नेत्यांची गरज आहे. युक्रेन आणि इस्रायलला त्यांच्या संबंधित संघर्षांच्या संदर्भात निधी रोखल्याबद्दल त्यांनी रिपब्लिकनवर टीका केली. तसेच सीमा सुरक्षा मजबूत करण्यास समर्थन न दिल्याचा आरोपही केला आहे.

निधी रोखला
याचबरोबर, रिपब्लिकन पक्षाने युक्रेन आणि इस्रायलला पाठवण्यात येणारा निधी रोखल्याचा आरोप ज्यो बायडन यांनी केला. ते म्हणाले की, मंगळवारी मी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. ते रशियन आक्रमणाविरुद्ध स्वातंत्र्यांच्या लढ्यात आपल्या लोकांचे नेतृत्व करत आहेत. आमची मदत मागण्यासाठी ते अमेरिकेत आले होते. तरीही रिपब्लिकन मदतीसाठी पुढे जात नाहीत. आम्हाला दक्षिण सीमेवरील परिस्थितीकडे लक्ष द्यावे लागेल. मी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यास वचनबद्ध आहे. सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी आम्हाला निधी गरज आहे. परंतु, संसदेत रिपब्लिकन मदतीसाठी कार्य करणार नाहीत, असे म्हणत ज्यो बायडन यांनी रिपब्लिकन खासदारांवर टीका केली.

१.४ मिलियन डॉलर कर चोरीचा आरोप
राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा मुलगा हंटर यांच्यावर युक्रेन आणि चीनमधील व्यावसायिक व्यवहारांमध्ये कुटुंबाच्या नावावर प्रभावीपणे व्यापार केल्याचा आरोप आहे. हंटर बायडन यांच्यावर १.४ मिलियन डॉलर कर चुकवल्याचा आरोप आहे. तसेच, हंटर हे अलिशान जीवनशैली जगण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च करत आहेत असा आरोप आहे. यावर हंटर बायडन यांनी बुधवारी वॉशिंग्टनमध्ये दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझे वडील माझ्या व्यवसायात आर्थिकदृष्ट्या गुंतलेले नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR