24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयकर्नाटकात ऑपरेशन हस्त?

कर्नाटकात ऑपरेशन हस्त?

बंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी ८ नोव्हेंबर रोजी ‘ऑपरेशन हस्त’ची घोषणा केली होती. यावेळी ते म्हणाले होते की १५ नोव्हेंबरपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांना काँग्रेसमध्ये सामील केले जाईल. विशेष म्हणजे, कर्नाटकात विरोधी पक्षांच्या गटात गोंधळ सुरु असायच्या चर्चा सुरु आहेत. जनता दल सेक्युलरने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच अजूनही अनेक आमदार वेटिंगवर असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.

दरम्यान, भाजपचे तीन आमदार काँग्रेसच्या डिनर कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने राज्यात एकाच खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी कर्नाटकमधील काँग्रेसच्या डिनर कार्यक्रमात भाजपच्या तीन आमदारांचा सहभाग हा ‘गंभीर मुद्दा’ असल्याचे वर्णन केले आहे. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, विजयेंद्र म्हणाले की, ते या तीन आमदारांकडून यावर उत्तर मागणार आहेत. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, हे आमदार कोणत्याही बैठकीत सहभागी झाले नसून केवळ बुधवारी रात्रीच्या जेवणात सहभागी झाले होते. भाजपच्या या तीन आमदारात एसटी सोमशेखर, शिवराम हेब्बर आणि विधानपरिषद सदस्य एच विश्वनाथ यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR