बार्शी : तालुक्यातील भालगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे लोकनेते स्व. गोपिनाथराव मुंडे यांची जयंती जि.प.सदस्य व भाजपा तालुकाध्यक्ष मदन दराडे सर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच सचिन सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य भाऊराव दराडे, राजेंद्र कराड, गणेश भोसले, सोसायटी व्हा. चेअरमन अजय घोळवे व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच भालगावातील मुंडे यांच्यावर प्रेम करणारे ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जि.प.सदस्य व भाजपा तालुकाध्यक्ष मदन दराडे सर यांनी लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या कार्याचा आढावा घेत कायम सर्वसामान्य जनतेसाठी सदैव कार्यतत्पर असणारा आणि गोरगरीब, बहुजन समाजाच्या विकासासाठी अखेरपर्यंत लढणारा असा लोकनेता पुन्हा होणार नाही असे सांगितले.