करमाळा : प्रतिनिधी
करमाळ्यातील अनेक विविध विकासकामे प्रलंबित असून विशेषतः कुकडीचा प्रश्न मार्गी लावणे, वीज वितरण कंपनीतील प्रश्न सोडवणे, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवणे या सह करमाळा तालुक्यातील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी मी कार्यरत असणार असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकीय निर्णय घेत राहू असे प्रतिपादन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी माजी आमदार जगताप यांचा सत्कार केला. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड,संचालक बबनराव मेहर,,सोसायटी सचिव अमृत कटारिया मार्केट कमिटीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर ,युवा नेते रवींद्र उकिरडे,डॉक्टर बारकुंड, दिगंबर रासकर, खडकीचे प्रगतशील शेतकरी आबा नलवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आमदार जगताप म्हणाले की मी राजकारणात कधी कोणाचा द्वेष केला नाही विरोधक असला तरी त्याचे काम करण्याची प्रयत्न केले. राजकीय कारकीर्दीत कधी जातीवादाला थारा दिला नाही. विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची विकास कामे सुरू आहेत.तालुक्यातील सर्व सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत. स्वार्थाच्या राजकारणासाठी सहकारी संस्थांचा बळी देणे हे तालुक्याला परवडणारे नाही.
ज्या ज्या वेळेस जगताप गटाच्या हातात सत्ता आली त्या त्यावेळेस आम्ही प्रामाणिकपणेच काम केले.जगताप गटावर करमाळा तालुक्यातील जनतेचा विश्वास असून त्या विश्वासाला पात्र राहूनच काम करीत आहे.भगवान के घर मे देर है लेकिन अंधेर नही या म्हणी प्रमाणे या पुढील काळात सुद्धा जगताप गटाची राजकीय भवितव्य उज्वल असणार आहे याचा मला आत्मविश्वास असल्याचा दावा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केला.