26.4 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeअंतरराष्ट्रीययुक्रेन होणार युरोपियन युनियनचा सदस्य?

युक्रेन होणार युरोपियन युनियनचा सदस्य?

सदस्यत्व प्रक्रिया सुरू करण्यास तयार ४ लाख कोटींच्या मदत पॅकेजवर हंगेरीचा अडथळा

कीव्ह : युरोपियन युनियन नेत्यांनी युक्रेनसाठी सदस्यत्व प्रक्रिया सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. गुरुवारी रात्री उशिरा, २७ एव सदस्य देशांची शिखर परिषद झाली, ज्यामध्ये युक्रेन आणि मोल्दोव्हाला सदस्य बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यावर सहमती झाली. २७ पैकी २६ देशांनी युक्रेनला सदस्य बनवण्याच्या बाजूने मतदान केले. फक्त हंगेरीने त्याला विरोध केला.

हंगेरीच्या विरोधानंतर युरोपियन युनियनकडून युक्रेनला देण्यात येणा-या ४.५८ लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेजवर कोणताही करार होऊ शकला नाही. त्याच वेळी, युक्रेनला ईयूचे सदस्य झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो. शिवाय, त्याची लष्करी ताकद वाढेल आणि त्याला रशियाविरुद्ध मोठी ताकद मिळेल. इतर देशाने हल्ला केलेल्या देशाला मदत करण्यासाठी सर्व एव देश एकत्र येतात. यासंदर्भात परस्पर संरक्षण कलम आहे, ज्यामुळे संकटात सापडलेल्या देशाला मदत करणे अनिवार्य होते. एप्रिल २०२२ मध्ये, युनियनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन यांनी युक्रेनियन अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना अधिकृत सदस्यत्व प्रश्नावली सुपूर्द केली. एव सदस्य होण्यासाठी काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. उर्सुलांनी हे प्रश्न झेलेन्स्की यांना सादर केले होते. एप्रिल २०२२ मध्ये, युनियनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन यांनी युक्रेनियन अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना अधिकृत सदस्यत्व प्रश्नावली सुपूर्द केली. एव सदस्य होण्यासाठी काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. उर्सुलांनी हे प्रश्न झेलेन्स्की यांना सादर केले होते.

युरोपीय देशांसोबत खुली बाजारपेठ
आर्थिक दृष्टिकोनातून, एव चे सदस्य झाल्यामुळे युक्रेनला सर्व युरोपीय देशांसह एक खुली बाजारपेठ मिळेल आणि सर्व वस्तू कोणत्याही निर्बंधांशिवाय एका देशातून दुस-या देशात सहज जाऊ शकतील. त्याचबरोबर युक्रेनमधील नागरिकांनाही मोठी मदत मिळेल, त्यांना अनेक प्रकारचे अधिकार मिळतील. उदाहरणार्थ, कोणताही नागरिक युक्रेनमधून कोणत्याही युरोपीय देशात आला, तर त्यांना तेथे तीन वर्षे राहण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करण्याची गरज भासणार नाही.

एखादा देश ‘ईयू’चा सदस्य कसा बनतो?
युरोपियन युनियनचे सदस्यत्व ही युक्रेनची जुनी मागणी आहे, ज्यासाठी ते लढत आहेत. युक्रेनसाठी जसे नाटोचे सदस्यत्व महत्त्वाचे आहे, त्याच धर्तीवर युरोपियन युनियनचे सदस्य होणेही युक्रेनसाठी महत्त्वाचे आहे. तथापि, एव सदस्यत्व मिळविण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि लांबलचक आहे आणि त्यासाठी काही वर्षे लागू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR