25.4 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeसोलापूरमहानगरपालिकेच्या शाळेतील इमारतीचे नूतनीकरणाच्या कामाचे लोकार्पण

महानगरपालिकेच्या शाळेतील इमारतीचे नूतनीकरणाच्या कामाचे लोकार्पण

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या कॅम्प आवारातील सर्व शाळेतील इमारतीचे नूतनीकरणा साठी सुमारे रक्कम रुपये 1.50 कोटी इतके सी.एस.आर फंडातून करण्यात आले असून त्याचे लोकार्पण सोहळा कॅम्प प्रशाला येथे कौन्सिल जनरल कॉंग झिंयान हुआ यांच्या शुभहस्ते तर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या अध्यक्षतेखाली तर याप्प इंडियाचे सी.ई.ओ चेन हुआझु, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त विद्या पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

प्रथम सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उपस्थिती मान्यवरांचा सत्कार महापालिका आयुक्त शीतल- तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आल्या. यावेळी महापालिका आयुक्त यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या कार्याची माहिती दिली डॉक्टर कोटणीस यांनी दुसऱ्या महायुद्धात चीनची रुग्णसेवा कशा प्रकारे केली.या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना सागितलं तसेच याप इंडिया, एच.डी.एफ.सी बँक, आय सी आय सी आय फाउंडेशन यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या कॅम्प शाळेला सी एस आर मधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयुक्त यांनी आभार मानले.

महापालिकेचे कॅम्प शाळेमध्ये याप इंडियाच्या सीएसआर मधून सर्व शाळांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आवारातील सर्व शाळेत रंगकाम, शाळांची दुरुस्ती, दर्शनी भागातील लोखंडी गेट,मैदानाचे सपाटीकरण व लाल माती टाकणे इत्यादी त्याच्या सीएसआर मधून करण्यात आले आहे. आयसीआयसीआय फाउंडेशनच्या माध्यमातून कॅम्प शाळेचे छताची दुरुस्ती, लोखंडी खिडक्या, जाळ्या बसवणे त्याचबरोबर सर्व शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग चे काम करण्यात आले. एचडीएफसी बँकेच्या अर्थसाहाय्यातून आणि कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट च्या सहयोगातून सोलापूर महानगरपालिकेच्या कँम्प परिसरातील 8 शाळेतील मुली आणि मुलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आले.

या शाळेच्या परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या वेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, प्रशासन अधिकारी जावीर शेख,व्हॉइस प्रेसिडेंट संतोष मादास, एचडीएफसी बँकेचे प्रातिनिधिक पदाधिकारी म्हणून क्लस्टर हेड .सुनील मनहास , सोलापूर जिल्हा शाखा प्रमुख . मयूर गाजरे, एरिया हेड अजिंक्य पुरवत तसेच कोहिजन फाउंडेशन ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक मा.डॉ.दयानंद वाघमारे, आयसीआयसीआय बँकेचे ब्रांच मॅनेजर मनीष हुल्ले, स्वप्नील ढेकळे,मनोहर दावणे, स्नेहल पाटील, ज्ञानेश्वर बनसोडे, शाळा परिवेक्षक भगवान मुंडे, मुख्याध्यापक, कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR