27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयसंभाजीराजेंनी दिल्लीत बोलावली खासदारांची बैठक

संभाजीराजेंनी दिल्लीत बोलावली खासदारांची बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकारण चांगलच तापले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

१८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे होणा-या या बैठकीस संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या बैठकीला शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांच्यासारखे बडे खासदार उपस्थित राहणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, सध्या संसदेचे हिवाळी अधिवशन सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व खासदार हे दिल्लीत उपस्थित आहेत. त्यामुळे आता यामधील कोणकोणते खासदार बैठकीला उपस्थित राहणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जरांगे यांचा २४ पर्यंत सरकारला अल्टिमेटम
मराठा समाजाला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा सरकारला पुढील आंदोलन जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे २४ डिसेंबरनंतरचे आंदोलन कसे असणार, याबाबत वेगवेगळ््या चर्चा सुरू आहेत. अशातच २४ डिसेंबरनंतर मुंबईत जरांगेंचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात जोरदार वातावरण निर्मिती करण्यात येत असून, मुंबईतील मंत्रालयावरही मोर्चा धडकू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR