25.3 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपुत्रप्राप्तीसाठी दुसरे लग्न; मुलगा झाल्यावर पतीने सोडून दिले

पुत्रप्राप्तीसाठी दुसरे लग्न; मुलगा झाल्यावर पतीने सोडून दिले

हायकोर्टाने दिला दणका

मुंबई : पहिल्या पत्नीपासून मुलगा न झाल्याने भुलथापा देत दुसरीशी लग्न केले. तिला मुलगा झाल्यावर घरातून हाकलून दिले, अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातील याचिकाकर्तीने न्यायपीठासमोर तिची कैफियत मांडली. पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता केवळ मुलगा होण्यासाठी दुसरे लग्न केले. मुलगा होताच घराबाहेर हाकलल्याची आपबिती तिने याचिकेद्वारे मांडली. तिने पोटगी देण्याची विनंती याचिकेत केली होती. सुनावणीअंती मुंबई उच्च न्यायालयाने पतीचे चांगलेच कान टोचले. पीडित पत्नीला दिलासा दिला.

प्रकरणात दुस-या पत्नीने दीर्घ न्यायालयीन लढाई जिंकली. पतीने फसवणूक केल्याने तिने याविरोधात स्थानिक न्यायालयात दाद मागितली. पतीने घरातून हाकलून दिल्याने निर्वाहासाठी पोटगीची मागणी केली. त्यानंतर तिने हायकोर्टात धाव घेतली. गेल्या नऊ वर्षांपासून पोटगीची रक्कम पती देत नसल्याची कैफियत तिने न्यायालयासमोर मांडली.

पहिली पत्नी असताना घटस्फोट घेतल्याचे खोटे सांगत दुसरे लग्न केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. त्यात दुस-या पत्नीला न्यायालयाने दिलासा दिला. मासिक अडीच हजार रुपयांप्रमाणे नऊ वर्षांपासूनची असलेली पोटगीची थकबाकीची रक्कम पतीने दोन महिन्यांच्या आत या दुस-या पत्नीला द्यावी, असा आदेश न्या. राजेश पाटील यांनी पतीला गुरुवारी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR