सेलू : येथील शिक्षक कैलास मलवडे यांचे सुपुत्र संगमेश यांची (इंडीयन आर्मी) भारतीय सेना दल लेफ्टनंट या अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. वयाच्या २१व्या वर्षी लेफ्टनंटपदी निवड झाल्यामुळे आज साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, उपाध्यक्ष चंदशेखर मुळावेकर, रामराव सावगीकर, रामराव लाडाने, विनोद तरटे, योगेश कुलकर्णी, गंगाधर आडळकर, शेख इम्रान, मुश्ताक भाई, खाजाभाई गुत्तेदार, दत्ता पौळ, अविनाश आडाळकर, संतोष हुंगे, सुनील बोडखे, विलास पौळ, शेख अबूजर, नितीन आडळकर इत्यादीच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते नविन वर्षाची दीनदर्शीका उदघाटन करण्यात आले.