25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रसातारा-लातूर महामार्गावर अपघात; १ ठार

सातारा-लातूर महामार्गावर अपघात; १ ठार

सातारा : सातारा-लातूर महामार्गावर पुनर्वसन रोहोट बस स्टॅण्डसमोर दुचाकीला क्रेटाने समोरून धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. बाळू शंकर साळुंखे (वय ५५, रा. खडकी) असे मृताचे नाव आहे. ते पळशी येथे हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते.

बाळू शंकर साळुंखे हे पळशी येथे हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळी शाळेत अर्धा दिवस भरून इलेक्ट्रॉनिक मोटारसायकलवरून (क्रमांक एमएच १४ एलसी ३८१२) ते घरी निघाले होते. सातारा- लातूर महामार्गावर पुनवर्सन रोहोट येथील बस स्टॉपवर आले असताना धामणी येथील रहिवासी असलेले व सध्या नातेपुते (ता. माळशिरस ) येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले राजरतन सुदाम नागरगोजे (मूळ रा. धामणी,) हे पत्नीसह त्यांच्या क्रेटा गाडी (क्रमांक एमएच ४५ एक्यू ४०५६) या चारचाकीने मांढवे (ता. खटाव) या गावी निघाले होते.

त्यांच्या गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत बाळू साळुंखे जागीच ठार झाले. धडक दिल्यानंतर राजरतन नागरगोजे यांना अकलूज येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR