23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयपुरुषांच्या तुलनेत महिलांना पगार कमी अयोग्य

पुरुषांच्या तुलनेत महिलांना पगार कमी अयोग्य

सरन्यायाधीश चंद्रचूड यांची खंत महिला हक्कांवर केली टिप्पणी

नवी दिल्ली : देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी पुरुष आणि महिलांच्या पगारातील तफावत आणि महिलांच्या हक्कांबाबत मोठे वक्तव्य केले असून पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी पगार मिळणे हे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

महिलांना पुरुषांपेक्षा कमी पगार मिळतो असे वक्तव्य सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केले. बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. देशात महिला आणि पुरुष यांच्या पगारातील तफावतीवर बोलताना चंद्रचूड म्हणाले की, हा मुद्दा भारतीय महिलांसाठी विशेषत: ठळक आहे, विशेषत: उपेक्षित असलेल्या महिलांसाठी. विविध व्यावसायिक क्षेत्रात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान असूनही त्यांना अजूनही पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळत असल्याचे चंद्रचूड म्हणाले.

देशाचे १९ वे सरन्यायाधीश ईएस वेंकटरामय्या यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना सरन्यायाधीश म्हणाले की कायद्याचा उद्देश सार्वजनिक आणि खासगी दोन्ही ठिकाणी विस्तारित केला पाहिजे. भारतीय दंड संहितेत अशी तरतूद आहे की जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती भांडतात आणि सार्वजनिक शांतता बिघडवतात तेव्हा तो गुन्हा मानला जातो. परंतु जेव्हा हाणामारी सार्वजनिक ठिकाणी होते तेव्हाच तो दंडनीय आहे. अशा परिस्थितीत, कायद्याचा भर केवळ वादांच्या गुणवत्तेवर आणि तोटेवर नाही, तर तो कुठे होत आहे यावर आहे.

गृहिणींना घरकामाचा मोबदला नाही
सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, घर हे गृहिणीसाठी आर्थिक घडामोडींचे ठिकाण आहे. जिथे तिला तिच्या सेवेसाठी वेतन दिले जात नाही. त्याचवेळी, महिलांना सार्वजनिक ठिकाणी विशिष्ट सेवा आणि व्यवसायांसाठी मर्यादित केले जाते. अशा प्रकारे त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे चंद्रचूड म्हणाले.

घरगुती नोकरांना कॉर्पोरेटसारखे फायदे नाहीत
समाजाने आपल्याला शिकवलेल्या कल्पनेच्या पलीकडे आपले मन मोकळे करण्यास आपण तयार आणि इच्छुक असतो. तेव्हा न्यायाची भावना विकसित होते. जेव्हा लोक त्यांच्या घरात नोकर ठेवतात, तेव्हा त्या व्यक्तीला कॉर्पोरेट कर्मचा-यासारखे फायदे दिले जातात का? असा सवालही चंद्रचूड यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR