28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरकोट्यवधींचा क्रिप्टो करन्सी घोटाळा; सीबीआय चौकशीची मागणी

कोट्यवधींचा क्रिप्टो करन्सी घोटाळा; सीबीआय चौकशीची मागणी

सोलापूर : गतवर्षी सीसीएच अ‍ॅपद्वारे घडलेल्या अ‍ॅनेटा स्कॅमनंतर पुन्हा एकदा सोलापूरसह देशभरातील गुंतवणूकदारांची सोनीटिक्स कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप गुंतवणूकदार सचिन पृथ्वीराज चौहान यांनी माध्यमांशी बोलताना केला, या प्रकरणी दाद मागण्यासाठी पोलिस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली असून, या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी केल्यास हजारो कोटींचा घोटाळा समोर येईल, असे गुंतवणूक दाराचे म्हणणे आहे.

शंभर दिवसांत डबल पैसे देण्याचे गुंतवणूकदारांना आमिष दाखवून सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेकडोंची फसवणूक झाल्याचा आरोप करीत फसवणूक झालेल्या नागरिकांनी काही सामाजिक संघटनांची संपर्क साधून माध्यमांसमोर आपले म्हणणे मांडले. सोनीटिक्स कंपनीचे संचालक, पार्टनर आणि एजंटांनी गुंतवणूकदारांना प्रलोभन दाखवून शिववर्स क्रिप्टो कॉइनची निर्मिती करून अनेकांना भावनिक करून फसवणूक केल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.

यातील तक्रारदार सचिन चौहान यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीचे अक्कलकोट येथील दोन एजन्ट कंपनीचे फाउंडर मेंबर असल्याचे सांगून कंपनीबद्दल माहिती मोठ्या आर्थिक परताव्याचे आमीष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले, सोलापुरातील दमाणी नगर भागातील हॉलमध्ये क्रिप्टो करन्सि प्रसार करण्यासाठी ३ ऑक्टोबर २०११ रोजी मोठा सेमिनार घेतला यावेळी कंपनीचा देशभर जाळे असून, देशात, परदेशातही काम असल्याचे सांगितले होते. कुटुंबाला स्थैर्य मिळण्याच्या दृृृष्टीने क्रिप्टो करन्सीमध्ये २ लाख रुपयांची गुंतवणूक केली असे चौहान यांचे म्हणणे आहे.किप्टो करन्सीमध्ये सोलापूरसह जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले आहेत. ५ मार्च, २०२३ मध्ये गुंतवणूकदार पुणे येथील कार्यालयात जाऊन गुंतविलेल्या पैशांची मागणी केली असता भूलथापा मारून परत पाठविण्यात आले,

माझ्यासह अन्य गुंतवणूकदारांनी मेगावर्स, शिववर्स, एसरीएक्स क्चाइन या तीन प्रकारच्या क्वचाइनमध्ये गुंतवणूक केली आहे. तिन्ही अ‍ॅप सोनीटिक्स कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येतात. या माध्यमातून आपली फसवणूक झाल्याचे चौहान यांच्यासह अन्य गुंतवणूकदारांनी आरोप केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR