28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आंदोलकांचा जलसमाधीचा इशारा

मराठा आंदोलकांचा जलसमाधीचा इशारा

संभाजीनगर येथे आंदोलक उतरले धरणात

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील मराठा आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वैजापूर शहरातील नारंगी सारंगी धरणात उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. तर, याचवेळी आंदोलकांनी जलसमाधीचा इशारा दिल्याने पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

मराठा आरक्षण आणि शेतक-यांच्या प्रश्नांसाठी मराठा आंदोलक आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातील नारंगी सारंगी धरणात आंदोलन करत आहेत. आंदोलकांनी जलसमाधीचा इशारा दिला दिल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनास्थळी तैनात करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. तर, पोलिसांकडून आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त…
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज वैजापूर येथील नारंगी सारंगी धरणात उतरून जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आंदोलनाच्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सोबतच, धरणाच्या ठिकाणी पाणबुड्या देखील ठेवण्यात आल्या आहेत. तर, काही अनुचित प्रकार घडल्यास होडी देखील सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच आंदोलनाच्या ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील आल्याचे पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR