24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे शहरातील विद्यार्थी इसिस मॉड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये

पुणे शहरातील विद्यार्थी इसिस मॉड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये

एनआयए पथक पोहोचले घरी

पुणे : महाराष्ट्रात अनेक भागात इसिस मॉड्यूलच्या कारवाया सुरू होत्या. पुणे पोलिसांनी सर्वांत प्रथम हा प्रकार उघड केला. एका मोटारसायकल चोरी प्रकरणात महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युनूस साकी या दोघांना १८ जुलै रोजी पकडले होते. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार शाहनवाज फरार झाला होता. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर या शहरापर्यंत पोहचलेले इसिस मॉड्यूल अमरावती जिल्ह्यात आले. आता पुणे शहरात इसिस मॉड्यूलच्या संपर्कात आलेल्या एका विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली.

पुण्यात १९ वर्षीय तरुणाची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सॅलिसबरी पार्कमध्ये राहणा-या १९ वर्षीय विद्यार्थ्याची एनआयएकडून सोमवारी चौकशी करण्यात आली आहे. त्याचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले आहे. बंगळुरूमधील इसिस मॉड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तो सहभागी झाला. संबंधित तरुणाची कसून चौकशी एनआयएचे पथक करत आहे. विद्यार्थ्याच्या चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अमरावतीच्या अचलपूर शहरामध्ये मध्यरात्री एनआयएने केलेल्या छापेमारीत एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले. त्या विद्यार्थ्यास अमरावतीला आणले गेले आहे. अमरावतीमध्ये एका ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्तात त्याची कसून चौकशी एनआयएकडून सुरू आहे. एनआयएने ताब्यात घेतलेला हा विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असण्याचा संशय एनआयएला आहे. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याकडून लॅपटॉप आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. रविवारी मध्यरात्रीच अचलपूर, परतवाडा आणि समरसपुरा पोलिसांचा बंदोबस्त घेऊन ही कारवाई एनआयएने केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR