24 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रवांग्याने केली शंभरीपार, टोमॅटो गडगडला

वांग्याने केली शंभरीपार, टोमॅटो गडगडला

पुणे : चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याची मागणी वाढते. या मुहूर्तावर बाजारात वांग्याने चांगलाच भाव खाल्ला असून, एक किलो वांग्यासाठी १०० ते १२० रुपये मोजावे लागत आहेत. तर टोमॅटोचे भाव मात्र गडगडले असून, इतर भाजीपाल्याचे दर पंधरवड्यापासून स्थीर आहेत.

आज १८ डिसेंबर रोजी चंपाषष्ठी साजरी होत असून, या मुहूर्तावर खंडोबाची पूजा करण्यात येते. या दिवशी नैवैद्यात वांग्याच्या भरताचा समावेश केल्या जातो. त्यामुळे आदल्या दिवशी रविवारपासूनच भाजीमंडईत वांग्याला मागणी वाढल्याचे पहावयास मिळाले.

चार दिवसांपूर्वी ४० ते ५० रुपये – किलोने उपलब्ध होणा-या वांग्यांनी चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर मात्र भाव खाल्ला. रविवारी भाजीमंडईत वांग्याला १०० ते १२० रुपये किलोचा दर मिळाला. भाव कडाडल्याने नागरिकांनी वांगे खरेदी करताना हात आखडता घेत आहेत.

कांदा, लसनाच्या पातीलाही आला भाव
वांग्याचे भरीत बनविताना त्यात कांद्याच्या पातीचा समावेश करण्यात येतो. त्यामुळे कांद्याच्या पातीचीही मागणी वाढली आहे. त्या तुलनेत मात्र आवक कमी असल्यामुळे चांगला भाव आला होता. एका जुडीसाठी १५ ते २० रुपये भाव मिळाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR