25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयराज्यसभा आणि लोकसभेतून ६७ विरोधी खासदार निलंबित

राज्यसभा आणि लोकसभेतून ६७ विरोधी खासदार निलंबित

नवी दिल्ली : राज्यसभा आणि लोकसभेतील एकूण ६७ विरोधी खासदारांना सोमवारी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेतील गदारोळावर कडक कारवाई करत अध्यक्षांनी ३३ खासदारांना निलंबित केले तर राज्यसभेत सभापतींनी ३४ विरोधी खासदारांना निलंबित केले आहे. लोकसभेत विरोधी खासदारांनी फलक दाखविल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे जयराम रमेश यांनाही राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

अध्यक्षांनी हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजाच्या दिवसांसाठी सर्व खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी सदस्यांच्या निलंबनाची मागणी केली. यानंतर अध्यक्षांनी या सदस्यांना निलंबित केले. गेल्या शुक्रवारी लोकसभेत १४ विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले होते. अशा प्रकारे राज्यसभा आणि लोकसभेसह एकूण ८१ विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR