18.1 C
Latur
Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रहेल्मेट न वापरणा-या अधिका-यांवर होणार कारवाई

हेल्मेट न वापरणा-या अधिका-यांवर होणार कारवाई

पुणे : प्रतिनिधी
दुचाकीवरून प्रवास करताना अपघातांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आरटीओ विभागाने दिला आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पीएमपीएमएल आणि एसटी महामंडळाच्या बसचालकांसाठीही स्वतंत्र मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने कडक नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी आणि अधिकारी हेल्मेट न घालता दुचाकीवरून ये-जा करत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. त्यामुळे अशा निष्काळजी वर्तनावर अंकुश ठेवण्यासाठी विभाग अधिक सतर्क झाला आहे. संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी हेल्मेट न घातल्यास त्यांच्यावर शिस्तभंगात्मक कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार बसचालकांसाठी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार आहेत. अपघात टाळणे, सुरक्षित वाहनचालक पद्धती, वाहतूक नियमांचे पालन याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर असून सर्वच विभागांना नियम पालनाबाबत काटेकोर भूमिका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR