18.1 C
Latur
Monday, November 24, 2025
Homeराष्ट्रीयचक्क ‘आयसीयू’त लावले लग्न

चक्क ‘आयसीयू’त लावले लग्न

भयंकर अपघातानंतरही थांबला नाही विवाह रुग्णालयात वराने वधूच्या भांगेत भरले कुंकू

कोच्ची : केरळात एका अनोख्या विवाहाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओत लग्नाची घटीका एका भावूक क्षणात बदलली जेव्हा लग्न होण्याची अवघ्या काही तास आधी वधूचा अपघात झाला. त्यामुळे हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डात वराने अत्यंत हृदय हेलावणा-या क्षणी वधूच्या भांगेत कुंकू भरले. कोच्चीच्या अलप्पुझा येथील शालेय शिक्षिका अवनी हिचा विवाहाची तयारी सुरु होती. त्याच वेळी वधू मेकअप वगैरे तयारी करुन कारने येत होती त्याच वेळी तिच्या कारला मोठा अपघात झाला.

तिला लेकशोर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. ती जखमी होती तरी दोन्ही कुटुंबाने लग्न पुढे न ढकल्याचा निर्णय घेतला. कारण हा दिवस त्यांच्यासाठी खास होता. यावेळी नाकाला नळी लावलेली वधू बेडवर उपचार घेत होती आणि वराने तिच्या भांगी कुंकू लावून हे लग्न केले.
यावेळी अवनी हीचे मिस्टर प्रोफेसर शेरोन व्हीएम यांनी सांगितले की लग्नाचा मुहूर्त टळू नये यासाठी हा विवाह करण्यात आला. कोणत्याही संगीताशिवाय तसेच सजावटी शिवाय हे लग्न करण्यात आले. रुग्णालयाच्या अधिका-यांनी या दिवसाचे महत्व ओळखून या अनोख्या विवाहाला मंजूरी दिली.

असा झाला अपघात?
सोशल मीडियावर व्हायरल बातमीत केलेल्या दाव्यानुसार हा अपघात विवाहाच्या दिवशी पहाटे तीन वाजता झाला. जेव्हा अवनी काही नातेवाईकांसोबत ब्रायडल मेकअप करण्यासाठी कुमारकोम येथे जात होती. तिच्या कार चालकाचे नियंत्रण चुकल्याने कार एका झाडाला जाऊन ठोकरली. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने सर्व जखमींना कोट्टायम मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. अवनी हिच्या माकड हाडाला दुखापत झाल्याने तिला नंतर विशेष उपचारासाठी ७० किमी दूरवरील एर्नाकुलम येथील लेकशोर रुग्णालयात आयसीयूत दाखल केले गेले.

चित्रपट ‘विवाह‘ सारखे झाले लग्न
अपघातानंतर वर प्रोफेसर शेरोन व्हीएम रुग्णालयात पोहचले. त्यांनी रुग्णालयाच्या कर्मचा-यांना सांगितले की ते विवाह ठरवलेल्या वेळीच करु इच्छीत आहेत. डॉक्टरांनी सल्लामसलत केल्यानंतर आपत्कालिन विभागात एका साध्या पद्धतीने हा विवाह झाला. यावेळी अवनी हिला काही काही त्रास होऊ नये याची काळजी घेतली गेली. या संदर्भातील व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना शाहीद कपूर आणि अमृता राव यांचा साल २००६ च्या ‘विवाह‘ या प्रसिद्ध चित्रपटाचा सीन आठवला.

युजर्सच्या प्रतिक्रीया
या व्हीडीओवर युजर्सने प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने लिहीलेय की या प्रकारचे प्रेम मला विवाह सिनेमाची आठवण करुन देत आहे. दुस-या युजरने लिहिले की खरे प्रेम आणि माणूसकी अजूनही जीवंत आहे. तिस-या युजरने पोस्ट केली की विवाह मुव्ही वास्तविक जीवनात घडली. तर एका युजरने लिहीले आहे की अरे तिला बरे तरी होऊ द्या. हॉस्पिटलच्या बेडवर लग्न करण्याची एवढी घाई का ? किती अजब दिसत आहे. जर प्रेम खरे आहे तर त्याला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही असे अजब प्रकार केवळ भारतात घडू शकतात असेही त्याने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR