18.1 C
Latur
Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रशरद पवार आता कॉंग्रेस नेत्यांशी संवाद साधणार

शरद पवार आता कॉंग्रेस नेत्यांशी संवाद साधणार

कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींचे मन वळविण्याचा प्रयत्न
मुंबई : प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असताना महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून महत्त्वाची भूमिका घेण्यात आली असून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुंबई काँग्रेसच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यासाठी त्यांच्या श्रेष्ठींशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. त्यासाठी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्यांशी संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष एकत्रित मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवत असताना काँग्रेसनेही स्वबळाची घोषणा केली आहे. परंतु यामुळे महाविकास आघाडी कमकुवत होत असून, काँग्रेसचे मन वळवण्यासाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी शरद पवार चर्चा करणार आहेत. शनिवारी कार्यकर्त्यांसोबत निवडणुकीबाबत झालेल्या बैठकीत त्यांनी याचे सूतोवाच केले. मुंबईत मनसेलाही महाविकास आघाडीत घेऊन निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढवली. यात लोकसभेमध्ये मविआला घवघवीत यश मिळाले; मात्र विधानसभेत आघाडीची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली.

आघाडीत फूट पडू
नये, यासाठी प्रयत्न
ठाकरेंच्या शिवसेना पक्षाकडून मनसेसोबत युती करण्याचे घोषित केले असून, काँग्रेसनेही मुंबईत निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी काय रणनीती असावी, यावर चर्चा करण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी शप पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR