विल्मिंग्टन : अमेरिकेतील डेलावेअरमधील विल्मिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन यांच्या ताफ्यातील एका कारला दुस-या कारची धडक झाल्याचे समोर आले आहे. रविवारी (१७ डिसेंबर) बायडेन पत्नी जिल बायडेन यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना ही धडक झाली.यात कोणतेही नुकसान झालेले नाही.
मिळालेली माहिती अशी, बायडेन आणि त्यांची पत्नी सुरक्षित आहेत, दोघांनाही कोणतीही हानी झालेली नाही. अपघातानंतर बायडेन यांच्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी धडक झालेल्या कारच्या ड्रायव्हरवर कारवाई केली. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, बायडेन यांनी रात्री ८:०७ वाजता विल्मिंग्टनमधील बायडेन-हॅरिस २०२४ मुख्यालय सोडले. ते त्यांच्या निवडणूक प्रचार पथकासोबत होते. बायडेन यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच डेलावेअर परवाना प्लेट्स असलेल्या एका वाहनाने प्रचार कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मोटारगाडीचे रक्षण करणा-या एसयूव्हीला धडक दिली असे एका अहवालात म्हटले आहे.
या घटनेचा एका व्हिडीओ समोर आला आहे. यात सीक्रेट सर्व्हिस एजंट्स बायडेन यांना त्यांच्या कारमध्ये घेऊन जात असल्याचे दिसत आहे. अपघातात कारच्या बंपरचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर लगेचच सुरक्षा अधिका-यांनी त्या ड्राइव्हरला घेरले त्याची चौकशी केली.