17.8 C
Latur
Wednesday, November 26, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइथियोपियाच्या ज्वालामुखीची राख दिल्लीत; विमान सेवा रद्द

इथियोपियाच्या ज्वालामुखीची राख दिल्लीत; विमान सेवा रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विमानतळावारील सर्व उड्डाणे आज प्रभावित झाली. अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. ही उड्डाणे दिल्लीतील स्मॉग किंवा प्रदुषणामुळे नाही तर इथियोपियातील ज्वालामुखी स्फोटामुळे रद्द करण्यात आली.

दिल्लीपासून ४ हजार कि.मी. अंतरावरील हायली गुब्बी येथे ज्वालामुखीचा उद्रेक १२,००० वर्षानंतर झाला. त्याची राख १४ कि.मी. उंचीपर्यंत उसळत राहिली आणि धुरासह राखेचे महाकाय ढग आकाशात गेले. हे राखेचे ढग दिल्ली आणि उत्तर भारतात पोहोचले. ही राख हाय अल्टीट्युडवरून वेगानं प्रवास करत गुजरातपर्यंत पोहचली. त्यानंतर ती राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबपर्यंत पोहचली. यानंतर विमातळावर सतर्कता बाळगण्यात आली आहे. ज्वालामुखीची राख आणि ढग यांचा विमानांच्या इंजिनवर आणि एअर फिल्ड ऑपरेशनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. इंडिगो, एकासा एअर, केएलएम यांनी आपल्या उड्डाणाच्या वेळापत्रकात आधीच बदल केले आहेत.

राखेच्या ढगाचा प्रवास…..
– राखेचा ढग सर्वप्रथम गुजरातमध्ये दाखल झाला आणि नंतर तो राजस्थान, वायव्य महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबच्या दिशेने सरकला.

– ही राखेची लाट १५,००० ते ४५,००० फूट उंचीवर १०० ते १२० किमी/तास वेगाने वाहत आहे.

– या राखेमध्ये फक्त राखच नाही, तर सल्फर डायऑक्साइड वायू, तसेच सूक्ष्म काच आणि खडकाचे कण यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR