ठाणे : प्रिया सिंह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ठाणे येथील न्यायालयाने अश्वजित गायकवाड याच्यासह तीन आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अश्वजीत हा राज्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्याच्यासह तीन आरोपींना पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले होते. प्रिया सिंगच्या आरोपानुसार, अश्वजीत हा तिचा ‘बॉयफ्रेंड’ होता आणि गेल्या साडेचार वर्षांपासून ती त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. आरोपीने तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते.
एका सोशल पोस्टच्या माध्यमातून प्रिया सिंहने आरोप केला आहे की, अश्वजीतने प्रियाला सांगितले होते की, त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे असून आता तो तिच्यापासून विभक्त राहतो. पण घटनेच्या दिवशी जेंव्हा अश्वजीतला त्याच्या पत्नीसोबत प्रियाने पाहिले तेंव्हा त्याला राग आला. हे घडले. त्यामुळेच त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रियाने केला आहे. प्रियाच्या म्हणण्यानुसार, अश्वजित गायकवाड याने तिला कारने चिरडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी अश्वजीतसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.